आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने अहमदनगर झोन-३६ अ अंतर्गत सहा जिल्ह्यांमधील शाखांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. नगरमधील संत निरंकारी सत्संग भवन, सावेडी या ठिकाणी योग शिक्षक कृष्णा पेंडम व निरंकारी सेवा दलचे क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग दिनात सेवा दलचे महिला व पुरुष सदस्यांनी तसेच भाविक सहभागी झाले होते.भारतातील विविध भागामध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकरी मिशनच्या वतीने सकाळी ६ ते ७.३० या वेळेत एकाचवेळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. मिशनची सामाजिक शखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून २०१५ पासून योग दिवस उत्साहात साजरा केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.