आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई पोलिसांची कारवाई:सराईत गुन्हेगाराला गावठी कट्टा व चांदीच्या दागिन्यांसह अटक

नेवासे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराईत गुन्हेगार नितीन ऊर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट याला सोनई पोलिसांनी गावठी कट्टा व चांदीच्या दागदागिन्यासह अटक केली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे, पोलिस नाईक सोमनाथ झांबरे, आदिनाथ मुळे, पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, गर्जे, आघाव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सराईत गुन्हेगार नितीन ऊर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट (वय ३०, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासे) यास गावठी कट्टा व चांदीच्या दागिन्यांसह असा एकूण ६५ हजार ५५० रुपये किमतीची चांदी व गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार, आर्म अॅक्टप्रमाणे, येरवडा पोलिस स्टेशन पुणे, नेवासे पोलिस स्टेशन, सोनई पोलिस ठाण्यात, नगर एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल असून तो फरार होता.

बातम्या आणखी आहेत...