आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:सत्ताधारी व ठेकेदारांचे साटेलोटे; विकासकामांचा दर्जा निकृष्ट

राहुरी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी नगरसेवकाचे ठेकेदारांशी साटेलोटे असल्याने शहरातील विकास कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे यांनी केला.

सोनवणे म्हणाले, विकासाच्या नावाखाली राहुरी शहरात सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असताना सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे. नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. शहरातील प्रभाग ५ व ६ मधील बंदीस्त गटारीचे काम नित्कृष्ट झाले आहे. ढापे फुटल्याने सांडपाण्याच्या गटारी तुंबत आहेत. विद्यामंदिर शाळेच्या लगत असलेल्या नगर परिषदेच्या स्वच्छता गृहावरील दोन्ही टाकीत पाण्याचा खडखडाट झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.स्वच्छता गृहावरील टाकीत पाणी भरले जात नाही हे परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने दुर्दैवी ठरले आहे.

शुक्लेश्वर चौकातील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेच दुरावस्था झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रगती शाळा ते तालुका कृषी विभाग कार्यालय या रस्त्याचे डांबरीकरण काम गेले अनेक महिन्यांपासून रखडले आहे.उपनगरांबरोबरच राहुरी शहरात देखील नागरी सुविधांची अबळ झाली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नाही.राहुरी नगरपरिषदेत सुरू असलेल्या ठेकेदारी राजकडे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...