आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Satisfactory Rainfall This Year; A Large Crowd Of Devotees Gathered At The Temple And Its Surroundings To Hear The Prophecies Of Sreesanth Godad Maharaj | Marathi News

भाकित:यावर्षी समाधानकारक पाऊस; श्रीसंत गोदड महाराजांच्या सवंत्सरीत भाकीत, भाकित ऐकण्यासाठी मंदिर व परिसरात भाविकांनी मोठी गर्दी

कर्जत4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या वर्षी पाऊस समाधानकारक होईल. वादळे व नैसर्गिक आपत्तीचा अतिवृष्टी यांचा मुकाबला करावा लागेल. तसेच बाजारात तेजी-मंदी राहील. राजा व प्रजेला त्रास होईल, असे भाकीत गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तवण्यात आले. कर्जतचे ग्रामदैवत श्रीसंत गोदड महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे वाचन पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केले. या वर्षीचे भाकित ऐकण्यासाठी मंदिर व परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे वाचन मंदिरात केले जाते. आगामी वर्षे कसे असेल याचा अंदाज या संवत्सरित व्यक्त केला जातो. हे भाकीत ऐकण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आगामी पावसाळ्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे, तर तीव्र उन्हाळा व वळवाचा पाऊस असा अनुभव येईल. मान्सूनचे आगमन नियोजित वेळे अगोदर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला व समारोपाला समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. चैत्र ते भाद्रपद या सहा महिन्यात राजा व प्रजेला बिकट परिस्थितीतून जावे लागेल. वादळे येतील तसेच नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करावा लागेल. बाजारात तेजी मंदी जाणवेल, नंतर भाव कमी होऊन स्थिरता येईल. येत्या पावसाळ्यात मृग, आर्द्रा, पुनरवसू, पुष्य, आश्लेश, मघा, उत्तरा, चित्रा, या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल, तर पूर्वा, हस्त, स्वाती या नक्षत्रात पावसाबाबत अनिश्चितता वर्तवण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...