आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन रॅली:सावित्रीबाई फुले अभिवादन रॅलीद्वारे केला सारसनगरमध्ये स्त्री शक्तीचा जागर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याने सर्वांचे लक्ष वेधले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमले. या रॅलीच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.

रॅलीनंतर विधाते विद्यालयात ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम झाला. संस्थेचे बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, प्रा. शिवाजीराव विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे.

विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता, आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. सूत्रसंचालन राधाकिसन क्षीरसागर यांनी केले. स्वागत व प्रस्ताविक सारिका गायकवाड यांनी केले. आभार संतोष सुसे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...