आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित : 310 महाविद्यालयांना नोटीसा

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांची माहिती

अहमदनगर शहर व जिल्ह्यातील २०२१-२२ या वर्षात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेतील 1 हजार 764 अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ३१० महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात या वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी १५ जून ही अंतिम मुदत देण्यात होती.तर विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयात अर्ज दाखल केली होते. त्यापैकी २३ जून अखेरपर्यंत शिष्यवृत्ती योजनेचे १ हजार ७६४ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ३१० महाविद्यालयांना सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत, असे देवडे यांनी सांगितले. व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह ४६,शैक्षणिक शुल्क योजनेचे १७१ तर शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे ७६ देखील अर्ज प्रलंबित आहेत.

बातम्या आणखी आहेत...