आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीराम कृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री मोहनलाल रामावतार मानधना ज्युनियर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आठवडाभर विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर केले.
पाचवीसाठी चित्रकला स्पर्धा, तर सहावीच्या विद्यार्थ्यांनी सेन्सरी ऑर्गन्स रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले. सातवी, आठवी, नववीच्या वर्गांसाठी प्रश्नमंजुषा झाली. या स्पर्धेत लक्ष्मी हाऊस हा विजेता ठरला, तर राणा प्रताप हाऊस उपविजेता घोषित करण्यात आला. माणसाचे चंद्रावरील पहिले पाऊल, तसेच डायनासोरचा जन्म या वैज्ञानिक विषयावर शो झाला. शाळा व परिसरातील ४०० विद्यार्थ्यांनी या शोचा आनंद लुटला.
मुलांच्या दृष्टीने हा एक वेगळाच अनुभव होता. शाळेत विज्ञान शिक्षक व चित्रकला शिक्षकांनी मिळून भव्य रॉकेट व पवनचक्कीची निर्मिती केली होती. शाळेमध्ये येणाऱ्यांसाठी ते मोठे आकर्षण ठरले. सकाळच्या परिपाठात विद्यार्थ्यांनी पिरीओडिक टेबल गाण्याद्वारे सादर केला. एका समूहाने व्हॅलेन्सीवर आरती सादर केली.
या संपूर्ण उपक्रमांसाठी शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षिका अंजना पंडित, तबस्सुम, प्रांजली, किरण मोरे यांनी मेहनत घेतली. तसेच प्रतिकृती निर्माण करण्यासाठी चित्रकला शिक्षिका पूजा व अश्विनी यांनी भरपूर परिश्रम घेतले. तृप्ती व कांचनमाला यांनी प्राथमिकच्या वर्गासाठी उपक्रमाला मार्गदर्शन केले. आठवडाभरात घेतलेल्या सर्व स्पर्धांसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण नियोजनासाठी शाळेच्या प्राचार्या राधिका जेऊरकर व समन्वयक अंजना पंडित यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.