आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक सातमध्ये रंगार गल्ली व जिरेसाळ गल्ली या परिसरात माजी उपनगराध्यक्ष दिपाली बंग मित्र मंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. नाशिक येथील स्वाध्याय परिवाराच्या उज्वला मंत्री, सुनंदा बजाज, शोभा राऊत, रंजना भांगे, लिलाबाई चिंतामणी, मंगल सरोदे या जेष्ठ महिलांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी उज्वला मंत्री म्हणाल्या, स्वर्गीय मुंडे साहेब ओबीसीचे नेते होते. समाज संघटित करण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशातच आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील खेडोपाडी व तळागापर्यंत वाढवण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना शिवसेना भाजप युतीच्या राजवटीत उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळात त्यांनी ओबीसी समाजासाठी, मागासवर्गीय समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले.
पुढे देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण नियतीला ते मान्य नव्हते आणि मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. त्यांच्यासारखे ओबीसीचे नेतृत्व होणे नव्हे, असे गौरवोद्गार मंत्री यांनी काढले. त्यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्या. माजी नगरसेवक रामनाथ बंग, आलोक बंग, योगेश कलंत्री, विजय राठोड व इतर कार्यकत्यांनी विशेष परीश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.