आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:15 जानेवारीपासून लसीकरणाची दुसरी फेरी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २५ डिसेंबरच्या पहिल्या फेरीत ४७ बालकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७२ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता दुसऱ्या फेरीत १५ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. गोवर व रुबेलावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपल्या बालकांना गोवर व रूबेलाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.

महापालिकेच्या वतीने गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिमेचा करण्यात आला. पहिल्या फेरीत ११९ बालकांना डोस देण्यात आला आहे. आता दुसऱ्या फेरीत १५ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. सर्दी, ताप, खोकला, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधावा व उपचार करून घ्यावेत. बालकाचे नियमित लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा डोस राहिला असेल, त्यांनी २५ डिसेंबरपर्यंत केडगाव, जिजामाता, तोफखाना, महात्मा फुले, मुकुंदनगर, तोफखाना, नागापूर या नागरी आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून लस घ्यावी, असे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...