आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत व्यक्त:माध्यमिक शिक्षक सोसायटीचा राज्यात‎ मोठा नावलौकिक ; भाऊसाहेब कचरे‎

कुकाणे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक संस्थेचा राज्यात‎ अग्रगण्य संस्था असा नावलाैकिक‎ असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक व नेते‎ माजी अध्यक्ष भाऊसाहेब कचरे‎ यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक‎ शिक्षक सोसायटी आयोजित नेवासे‎ तालुका सभासद गुणवंत पाल्यांचा‎ पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त‎ सभासद कृतज्ञता सत्कार सोहळा‎ त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या‎ आवारात त्रिमूर्तीनगर झाला.‎

अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष‎ धोंडीबा राक्षे, तर प्रमुख अतिथी‎ म्हणून मारुतराव घुले पाटील शिक्षण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.‎ भरत वाबळे, रांजणीचे सरपंच‎ काकासाहेब घुले, संचालक‎ दिलीपराव काटे, सुरेश मिसाळ,‎ सत्यवान थोरे, त्रिमूर्ती संकुलाचे‎ प्राचार्य सोपान काळे, त्रिमूर्ती‎ पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कर्डिले, रावसाहेब चौधरी, सरपंच‎ दादासाहेब निपुंगे आदी उपस्थित‎ होते. प्रास्ताविक माजी उपाध्यक्ष व‎ संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी‎ केले. यावेळी भारत वाबळे,‎ सभासद प्रतिनिधी कुलदीप देशमुख‎ यांनी मनोगत व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...