आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नेहल गडाख यांचा अनोखा उपक्रम:सोनईत विद्यार्थ्यांनी बनवले बीयायुक्त मातीचे गणपती

सोनई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे आयोजन करावे, असे प्रतिपादन नेहल प्रशांत गडाख विश्वस्त यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय अनगर यांनी केले आहे. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव कार्याशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे, तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे गणेश मुर्तीकार दिपक बेंबळे उपस्थित होते. नेहल गडाख म्हणाल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या गणेश मुर्तीचे विर्सजनानंतर पाण्यात विघटन होण्यास किमान १ ते १७ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच त्यावर केलेल्या रंगकामामध्ये विविध केमिकलचा वापर केलेला असतो.

त्यामुळे ज्या नदी, तलाव व समुद्रात त्यांचे विर्सजन होते ते पाणी प्रदुषित होऊन जलचर प्राणी व वनस्पतीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी माती पासून बनविलेल्या गणेश मुर्तीची प्रतिस्थापना करावी व विर्सजनासाठी खड्डा खोदून त्यामध्ये पाणी सोडावे व त्यामध्ये गणेश मुर्तीचे विर्सजन करावे, त्यामुळे मातीचे विघटन होईल नंतर त्यात बीजरोपण करावे. त्यामुर्तीचे पावित्र जपून पर्यावरण संतुलनास मदत होईल.मुळा एज्युकेशन सोसायटीच्या परिसरामध्ये मातीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी डिजेचा वापर टाळावा. उत्सव काळात थर्माकॉल व प्लॅस्टिक अशा प्रकारच्या वस्तुचे डेकोरेशनसाठी वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अशोक तुवर यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर लावरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...