आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकजुट:संतप्त जमाव पाहून महावितरणने दिले सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्वासन

श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीजप्रश्नी लेखी आश्वासानंतर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे

श्रीगोंदे तालुक्यातील रायगव्हाण, राजापूर, माठ, येवती, ढवळगाव म्हसे व इतर काही गावातील संतप्त शेतकऱ्यांचा पिंपरी कोलंदर चौफुला येथील सब स्टेशन पुढे जमलेला पाहून महावितरण अधिकाऱ्यांनी ३० मार्चपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

सर्वच शेतीमालाचा भाव पडलेला असल्यामुळे आधीच शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे व आता हाता तोंडाशी आलेला शेतीमाल पाण्यावाचून डोळ्यादेखत शेतात पाण्या विना जळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात या भागात सध्या तरी पाण्याची शेतीसाठी थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु महावितरणने आठ ते दहा दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत केला आहे. पाच पाच मिनिटाला वीज जाणे, होल्टेज कमी जास्त होणे रात्रीची वीज सोडणे, दोन दिवस वीज न येणे यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून रायगव्हाण, राजापूर, माठ, येवती, ढवळगाव म्हसे व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी पिंपरी कोलंदर चौफुला येथील सब स्टेशन पुढे शिरूर-श्रीगोंदे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा श्रीगोंदे तहसीलदार, बेलवंडी पोलिस स्टेशन, व सबस्टेशन पिंपरी चौफुला यांना दिला होता.

मंगळवारी सर्व या गावातील शेतकरी सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास शेतकरी जमा झाले. मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्ता रोको मध्ये सहभागी झाल्यानंतर सब स्टेशन मधील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बोत्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी माजी सभापती संभाजीराजे देविकर बाळासाहेब पठारे,धनंजय मेंगवडे, सचिन चौधरी,अशोक वाखारे,अशोक ईश्वरे गुरुजी,मोहन हार्दे,अमोल पोटावळे,प्रकाष तळेकर,विठ्ठल हार्दे, लक्ष्मण रिकामे, गणेश पवार, सुभास कुटे व रायगव्हाण, राजापूर, माठ, येवती, ढवळगाव, म्हसे या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच पाच मिनिटाला वीज जाणे, कमी व्होल्टेजमुळे शेतकरी त्रस्त
३० मार्चनंतर सुरळीत वीज पुरवठा

बेलवंडी विभागाचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मांडुळे व बारहात्ते यांनी शेतकऱ्यांना २२० केव्ही लोणी व्यंकनाथ येथून कोळगाव, बेलवंडी, येळपणे, पिंपरी कोलंदर, मढेवडगाव या उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी लागणारी व्यवस्था सुरू करण्याचे काम प्रगतीप्रथावर आहे. ते २८ मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल. या उपकेंद्रांचा भार १३२ केव्ही श्रीगोंदे येथून कमी होणार आहे. ३० मार्चपर्यंत वरील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी हे रस्ता रोको आंदोलन थांबवले.

बातम्या आणखी आहेत...