आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:फसवणूक प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा; गुंतवणुकदारांची मागणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग मी इंडिया कंपनीकडून फंड पे ॲपच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील इतर आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच एमपीडीआय कायद्याअंतर्गत आरोपींची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन केली.

फिर्यादी सतीश खोडवे यांनी या गुन्ह्यातील तब्बल १७० वेगवेगळे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा केले आहेत. यासंदर्भातील जबाबही त्यांनी नोंदवला आहे. टीव्ही, रेडिओ वरील जाहिराती, या माध्यमातून गुंतवणूकीचे मोठ्या परत्याव्याचे प्लॅन, कंपनीचे माहितीपत्रक, १०७ कोटीची उलाढाल असणारी भारत सरकारकडे रजिस्टर कंपनी, बँकेचा डिस्काउंट व डिबेट कार्डचा वाटप, कॉर्पोरेट कंपन्याचा वापर, वेगवेगळ्या नावाने रजिस्टर असणाऱ्या ९ कंपन्या व यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेली रक्कम, पतसंस्थाना वाटप केलेले क्यूआर कोड, कंपनीचे व्यवसाय संबंधी माहिती, डिजिटल वॉलेटचा वापर करून सर्व रक्कम लपण्यासाठी वापरलेले मार्ग, असे पुरावे जमा करण्यात आल्याचे खोडवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...