आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत अंजली आढावची निवड

श्रीगाेंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा भवनमध्ये आयोजित महाराष्ट्र- गुजरात हिंदी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सारोळा सोमवंशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी अंजली गौतम आढाव हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. महाराष्ट्र व गुजरातमध्ये ही स्पर्धा चार गटात घेतली जाते. स्पर्धेतून प्रथम, द्वितीय आलेले दोन्ही विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात. पुढील महिन्यात महाराष्ट्र किंवा गुजरात यापैकी एका राज्यात घेतली जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अंजली आढावची निवड झाली आहे. सरपंच उज्ज्वला आढाव, मुख्याध्यापक अरुण फंड, रवींद्र पाडळे, मनोरमा मांडगे, यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...