आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नगरच्या पाच खेळाडूंची मिनी तायक्वांदो ऑलिंपिकसाठी निवड

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या संघटनेच्या ५ खेळाडूंची पुणे येथे जानेवारी महिन्यात होणार्‍या प्रतिष्ठेच्या मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीद्वारे शिल्पा पगारे, मयुर अडागळे, सुरज कोलते, युवराज लोखंडे, अनिल तोडकर या खेळाडूंची निवड झाली आहे. महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन यांच्या वतीने जानेवारी मध्ये पुण्यात मिनी ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी अहमदनगरचे पाच खेळाडू पात्र ठरले आहेत. हे सर्व खेळाडू नगर मधील एकलव्य तायक्वांदो अकॅडमी, छत्रपती तायक्वांदो, आयडियल तायक्वांदो या तायक्वांदो क्लासेसचे खेळाडू असून, अनेक वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष अनिल झोडगे, राज्य सचिव संदीप ओंभासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, गफ्फार पठाण, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरांगे, दिपाली बोडके, विशाल गर्जे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...