आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय कामगिरी:अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी मुसमाडे हिची निवड

नगर तालुका24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतुजा राजेंद्र मुसमाडे हिची अमेरिकेतील मिशीगन राज्यातील डेट्रॉईट या शहरातील वेनस्टेट विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.) या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली . ऋतुजाचे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण डहाणूकर इंग्लिश मिडीयम स्कूल,टिळकनगर व ज्युनियर कॉलेज येथे तर अभियांत्रिकी शिक्षण इंजिनिअरींग कॉलेज ऑफ कराड (जि. सातारा) येथे झाले आहे. तिने रॉकबॉल व व्हॉलीबॉल या खेळात राष्ट्रीय खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

तिला घडविण्यामध्ये तिचे पालक सर्व विषय शिक्षक व क्रिडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तिने इफिसायकल या प्रोजेक्टमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले होते. तसेच मायक्रोवेव्ह वॉटर हिटर सिस्टीमचे ग्रुप पेटंट मिळविले आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले होत आहे. ऋतुजा देवळाली प्रवरा येथील राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. नाना नारायण मुसमाडे व माजी नायब तहसीलदार पांडुरंग धोंडिबा जपे यांची नात आहे.

बातम्या आणखी आहेत...