आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लखांब स्पर्धा:राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी ऋतुजाची निवड; हनुमानगड राजस्थान येथे 3 ते 6 एप्रिल या कालावधीत

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानगड राजस्थान येथे ३ ते ६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ मल्लखांब या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी अहमदनगर येथील महावीर मल्लखांब आणि योगा ट्रेनिंग सेंटरची खेळाडू ऋतुजा सुनील गीते हिची निवड झाली, ऋतुजा गीते गेल्या दहा वर्षांपासून अहमदनगर येथील बालिकाश्रम रोड वरील महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग आणि प्रणिता तरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाचा सराव करत आहे.

गेल्या काही वर्षापासून याच मैदानावर लहान मुलांना मल्लखांबाचे प्रशिक्षण ऋतुजा देत आहे, ऋतुजा सध्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग कॉलेज अहदनगर येथे शिक्षण घेत आहे,राजस्थान येथील स्पर्धेत ऋतुजा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऋतुजा ही वृत्तपत्र विक्रेते व श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष सुनील गीते यांची कन्या आहे.

या निवडीबद्दल एमएमवायटीसीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल उत्पात, आप्पा लाडाने, ऋतुजा वाल्लेकर, सायली शिंदे, अक्षदा गुंड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...