आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:राहाता येथील वैष्णवी सोनवणे हिची‎ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड‎

राहाता‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे विभागातर्फे घेण्यात आलेल्या‎ शालेय कराटे स्पर्धेत राहाता येथील‎ ‎ वैष्णवी‎ ‎ बाळासाहेब‎ ‎ सोनवणे हिने‎ ‎ प्रथम क्रमांक‎ ‎ मिळून‎ ‎ सुवर्णपदक‎ पटकावले. तिची राज्यस्तरीय कराटे‎ स्पर्धेसाठी निवड झाली.‎ बारामती क्रीडा जिल्हा संकुलात‎ ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन‎ आयोजित जिल्हास्तरीय शालेय‎ कराटे स्पर्धा घेण्यात आली.

राहाता‎ येथील सेंट जॉन्स स्कूल ची विद्यार्थी‎ नी वैष्णवी बाळासाहेब सोनवणे हिने‎ १७ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत‎ उत्कृष्ट कामगिरी करत या स्पर्धेत‎ सुवर्णपदक मिळवले. वैष्णवी‎ सोनवणे हिने मागील वर्षीही‎ जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक‎ मिळवले असून नगर जिल्ह्यात‎ प्रथमच या विद्यार्थिनींनी पुणे‎ विभागाकडून सुवर्णपदक मिळून‎ राज्यस्तरीय कराटे स्पर्धा‎ खेळण्यासाठी मान मिळवला.

व्ही‎ स्टार मार्शल आर्ट अकॅडमीचे‎ प्रशिक्षक विजय मोगले, अनिल‎ सोमवंशी, मयूरी साबळे, भावना‎ निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली ६‎ वर्षांपासून ती कराटेचे प्रशिक्षण घेत‎ आहे. मागील वर्षी ब्लॅक बेल्ट‎ परीक्षेत तिने प्रथम क्रमाक‎ मिळवला. कमी वयात तिने तालुका‎ कराटे स्पर्धेत १ जिल्हास्तरीय कराटे‎ स्पर्धेत २ व पुणे विभागातर्फे १ असे‎ एकूण ४ सुवर्णपदक मिळविले.

पुणे‎ विभागीय कराटे स्पर्धेत कोल्हापूर,‎ सोलापूर, पुणे व नगर या‎ जिल्ह्यातील ४ स्पर्धकांना या स्पर्धेत‎ पराजित करून तिने उत्कृष्ट‎ कामगिरी करत आपल्या जिल्ह्याचे‎ नाव उंचावले. वैष्णवी सोनवणे ही‎ राहात्यातील पत्रकार बाळासाहेब‎ सोनवणे यांची कन्या आहे.‎ कोणत्याही क्षेत्रात मेहनत केली, तर‎ यश हमखास मिळते. वैष्णवी‎ म्हणाली, मला प्रशिक्षण देणारे व्ही‎ स्टार मार्शल आर्ट अकॅडमीचे सर्व‎ प्रशिक्षक, माझे आई-वडील यांच्या‎ मार्गदर्शनामुळे माझी राज्यस्तरीय‎ कराटे स्पर्धेसाठी निवड झाली.‎

बातम्या आणखी आहेत...