आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • 'Self absorbed' Children Need Immediate Treatment And Special Encouragement; Private Doctors Have Two To Three Cases Per Day, Need To Raise Awareness About The Disease | Marathi News

आरोग्य:‘स्वमग्न’ बालकांना हवेत त्वरित उपचार अन् गरज विशेष प्रोत्साहनाची; खासगी डॉक्टरांकडे रोज दोन ते तीन केसेस, आजाराविषयी जनजागृतीची गरज

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या बारा वर्षांपासून ऑटिझम (स्वमग्नता) या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भारतात दर ५९ मुलांमागे १ बालक या आजाराने ग्रस्त आहे. जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात दरवर्षी १४ ते १५ बालके या आजारावर उपचार घेण्यासाठी येतात. तर खासगी बालरोग तज्ज्ञांकडे दिवसाला २ ते ३ बालके या आजारावर उपचारांसाठी येतात. याचाच अर्थ जिल्ह्यात दरवर्षी किमान ७०० ते ८०० बालके या आजाराचे निदान करण्यासाठी येतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे. मुलांमध्ये मुलींपेक्षा अधिक प्रमाण (४:१) आहे.

गुणसूत्रीय बदल, जन्माच्या वेळेची परिस्थिती, मज्जातंतूंचे विस्कळीत जाळे, या कारणांमुळे हा आजार होतो. मोबाईल व माध्यमांच्या अति-वापरामुळे काही मुले स्वमग्न आढळतात. तर काही मुल ‘सुडो ऑटिझम’ (स्वमग्नते सारखा) सह मतिमंदत्व, अस्थिरता, झोपेचे आजार, स्वतंत्र होण्यात अडचणी, झटके येणे, वर्तनसमस्या, चिंताग्रस्तता, वाढीतला उशीर आढळतो.

सहा महिन्याचे मुल आईकडे बघून हसतंय की नाही, नजरेला नजर देत नाही, ओळखीच्या चेहऱ्यांकडे बघत नाही, ९ महिने, १२ महिने, ८ महिने व २४ महिन्यानंतर या आजाराच्या सूचना देणारी लक्षणे आहेत. या मुलांचे निदान प्रमाणित चाचण्यांद्वारे करता येते. ‘एम- चॅट’ ही जगमान्य असलेली पडताळणी चाचणी मानली जाते. जिल्हा रुग्णालयात ‘आयएसएसए’ प्रश्नावलीनुसार निदान होते. या आजाराच्या मुलांना प्रशस्तीपत्रही दिले जाते. ते पुढील सवलतींसाठी आवश्यक असते. याशिवाय ‘डीएसएम’ ही सखोल चाचणी तसेच INCLEN, CARS, ADOS या चाचण्या केल्या जातात. या मुलांचे निदान वयाची २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करता येते.

त्यांना आहारात गहू, ज्वारी, बाजरी, बेकरीचे पदार्थ, दुध व दुग्धजन्य पदार्थ, दही, मासे, सोयाबीन, मका, साखर, गूळ, खजूर, मध, बाहेरचे पदार्थ, रंग मिश्रित व साठवलेले अन्न, टोमॅटो, फळे - केळी, संत्री, सफरचंद देऊ नयेत. तर बटाटा/तांदूळ यांचे पीठ, अंडी, चिकन, मटन, नारळाचे दुध, तंतुमय अन्न उदा. हिरव्या भाज्या, तंतुमय अन्न उदा. हिरव्या भाज्या, फळे, पपई, पेरू आणि चिक्कू, हळद, कोथिंबीर, आले द्यावे.

या मुलांना प्रमाणित करण्यासाठी एप्रिल २०१६ ला केंद्र सरकारने दिव्यांग प्रमाणीकरण कायदा केला. नव्या २७ मानसिक आजारांचा यात समावेश आहे. या मुलांना पहिली ते पदवीपर्यंत परीक्षेसाठी जास्त वेळ, लेखनिक घेऊन बसण्यास परवानगी, सोपा अभ्यासक्रम, सवलती मिळतात. या मुलांना व्यावहारिक दृष्ट्या स्वतंत्र बनविणे हे महत्वाचे उद्दिष्ट असते. महाराष्ट्र सरकारच्या ‘एनओएस’ बोर्डाची परीक्षा मुले देऊ शकतात.

प्रोत्साहन देण्याची गरज
प्रत्येक स्वमग्न व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यालाही आवडी निवडी व व्यक्तिमत्व आहे. त्यांना सारखे टोचून बोलू नका. पालकांनी योग्य शास्त्रीय मार्गाचा वापर करावा. ही मुले इतरांपेक्षा कमी नसतात, तर वेगळी असतात. या मुलांकडे दुर्लक्ष करू नका. ते तुम्ही त्यांच्या जगात कधी येताय आणि त्यांना समजून घेताय याची ते वाट पाहत असतात. त्यांना प्रोत्साहन द्या, स्वतंत्र बनवा.''
डॉ. सुचित तांबोळी, बालरोग व बालविकासतज्ञ.

शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत
जनुकीय बदलांमुळे मुलांच्या मेंदूच्या वाढीत बदल होतो. मतीमंदताही आढळते. कायदेशीर मान्यतेनुसार आयएसएसए प्रश्नावलीनुसार निदान करुन सौम्य, मध्यम व तीव्र प्रकाराचे निदान केले जाते. शासकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याने पालकांनी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागात बालकांवर उपचार घ्यावेत.''
डॉ. अशोक कराळे, मानसोपचार विभागप्रमुख, जिल्हा शासकीय रुग्णालय.

बातम्या आणखी आहेत...