आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, बचतगट, तसेच बेरोजगार युवकांना दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, ब्युटी पार्लर, शिवणकाम यांचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य करून यशस्वी उद्योजक घडवण्याचे कार्य प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. असे प्रतिपादन संस्थेच्या संचालक अभिनव कुमार यांनी केले.
यशस्वी उद्योजक महिलांचे चर्चासत्र
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्या महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अशा यशस्वी उद्योजक महिलांचे चर्चासत्र प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शनिवारी (6 ऑगस्ट) आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अभिनव कुमार बोलत होते. यावेळी उषा शिंदे, संजीवनी बद्दल, प्रशिक्षिका जयश्री पाटील, यशस्वी महिला उद्योजक रेखा कासार, स्वाती कदम, लंका गुंड, दीपाली लोखंडे, स्वाती थोरात आदी उपस्थित होते.
महिलांना देण्यात आले प्रशिक्षण
अभिनव कुमार म्हणाले, प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत एमएसआरएलएम बचतगट सदस्यांना दुग्ध व्यवसाय, गांडुळ खतनिर्मिती, शेळीपालन, फास्ट फूड उद्योग, कागदी पिशव्या, पाकीट व फाईल तयार करणे, कुक्कुटपालन अशा विविध प्रकारचे दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या विविध प्रकारचे प्रशिक्षण सुमारे 400 ते 500 महिलांना देण्यात आले असून, 2022-24 मध्ये 24 प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध व्यवसाय, मेंढीपालन, अगरबत्ती तयार करणे, मेणबत्ती तयार करणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पाथर्डी व कर्जत येथेही महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिलांनी केले समाधान व्यक्त
यशस्वी महिला उद्योजक रेखा कासार, स्वाती कदम, लंका गुंड, दीपाली लोखंडे यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाल्यामुळेच आज आम्ही एक यशस्वी उद्योजक झालो आहोत. त्यामुळे आमच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आहे. बँकेने महिलांसाठी, तसेच बेरोजगारांसाठी प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उद्योगाची संधी आपल्याला दिली आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा. आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत. कुटुंबाची जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकतो, एवढी शाश्वती व आत्मबळ आम्हाला या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.