आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञ:स्व. राजीव गांधींनी आणले तंत्रज्ञानाचे युग : किरण काळे

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी देशामध्ये तंत्रज्ञानाचे युग आणले. देशामधील तरुणांना अधिक सक्षम करण्याचे काम केले. देशातील लोकशाही बळकटीकरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमध्ये राजीव गांधींचे अतुलनीय योगदान आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले.

स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन सभेचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी काळे बोलत होते.

याप्रसंगी शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण गीते, शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत, राणी पंडित, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इम्रान बागवान, शहर गणेश आपरे, राहुल गांधी विचार मंचाचे शहर अध्यक्ष सागर ईरमल, युवक काँग्रेसचे दीपक जपकर, निलेश चक्रनारायण, उमेश साठे, मनोज वाळके उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...