आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहराच्या विकासात स्व.अनिल राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी आमदारकीच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात विविध विकास कामे करुन नगर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हिंदूहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हाणी ते परिचित होते. नगर मध्ये शिवसेनेच्या उभारणीत त्यांचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे विचार आपण पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
माजी आमदार शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, दीपक खैरे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, अरुणा गोयल, पारुनाथ ढोकळे, दिपक कावळे, गौरव ढोणे, अभिजित अष्टेकर, रमेश खेडकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, स्व.अनिलभैय्या राठोड यांनी महिलांना सन्मान मिळवून देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. शिवसेनेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी मोठा संघर्ष करत त्यांचे प्रश्न सोडवले. त्यांची प्रेरणा नेहमीच आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.