आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:स्वाभिमानी शेतकरी, शिवसेना कार्यकर्त्यांचा राहुरीच्या मुळा धरणात जलसमाधीचा प्रयत्न

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यंाच्या बँक खात्यावर हेक्टरी ४० हजार रूपयांची मदत जमा करावी या मागणीसाठी ८ दिवसाची मुदत देऊनही शासनाकडून दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मुळाधरणाच्या पाण्यात उड्या मारल्या. दरम्यान पोलीस प्रशासनाने प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढल्याने अनर्थ टळला.

अतिवृष्टीत ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होऊन देखील नगर जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई यादीत आलेला नाही.पिकाचे नुकसान झालेला शेतकरी आर्थीक अडचणीत सापडल्याने २० डिसेंबरपर्यंत या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर हेक्टरी ४० हजार रूपयांची मदत द्यावी अन्यथा २१ डिसेंबरला राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेतली जाईल, हा इशारा देण्यात आला होता. मात्र एक आठवड्याचा कालावधी उलटूनही शासनाकडून या मागणीची दखल न घेतली गेली नाही.

त्यामुळे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते बुधवारी दुपारी मुळा धरणावर दाखल झाले. आंदोलकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये, ही खबरदारी घेऊन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस फौजफाट्यासह धरणावर तळ ठोकून होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुळा धरणावर स्पीड बोटी, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाची यंत्रणा तसेच पाण्यात पोहणाऱ्या तरूणांची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलक प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतानाच चौघा कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देऊन जवळच असलेल्या धरणाच्या पाण्यात उड्या मारल्या.

त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी धरणाच्या पाण्यात उड्या मारून चौघा आंदोलकांना बाहेर काढले. धरणावर आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राहुल चोथे, अब्दुल हमिद, भागवत निमसे, विजय शिरसाठ, विशाल तारडे, कैलास शेळके, सुनील शेलार, सुभाष चोथे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून राहुरीत आणले.

निधी येताच वर्ग करू अतिवृष्टीत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले असून शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठवलेला आहे. शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई वर्ग करण्यात येईल.'' अनिल पवार, प्रांताधिकारी.

बातम्या आणखी आहेत...