आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यसिध्दी:स्व. शंकरराव कोल्हेंनी कर्तव्यातून कार्यसिध्दीला आपलेसे केले

कोपरगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्ये मी केलं म्हणणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, मात्र सहकारातून स्वतःला घडवून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंनी कर्तव्यातून कार्यसिध्दीला आपलेसे केले, असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील श्रीक्षेत्र वाकडी येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या उपक्रमांतर्गत गोर-गरीब दीन दलित रूग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यांत आल्या. त्या लाभार्थ्यांना चष्म्यांचे शुक्रवारी मोफत वितरण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद कोल्हे होते. प्रास्ताविक शिवाजी लहारे यांनी केले.

मंडलिक महाराज म्हणाले, संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून माजीमंत्री स्व. कोल्हे यांनी जगभर भ्रमण करून मिळवलेल्या ज्ञानातून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांत साखर कारखानदारींत अलौकिक कार्य केलेले आहे. त्यांनी तुकाराम गाथेचा अभ्यास करून त्यातुन समाजशिक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन आणि शेतीविषयक ज्ञानाची माहिती घेत स्वतःला सिध्द केले.

जगाला पसायदानाच्या संदेशातुन शांतीचा मंत्र देणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींनी गोरोबा, सेनान्हावी, एकनाथ, नामदेव, सावता, नरहरी, चोखामेळा, तुकारामासह वारकरी सांप्रदाय आदिंना संत पद बहाल केले. नगर जिल्ह्यात सहकारातील संत अनंत आहेत. त्यात स्व. शंकरराव कोल्हे यांचे नांव उच्च कोटीचे आहे. संत हे कार्याने मोठी होतात, मात्र माणसं संपत्तीने नव्हे तर त्याच्या ज्ञानाने गुणाने आणि समाजकार्याने मोठी होत असतात. याप्रसंगी विक्रम वाघ, वसंत लभडे, अनिल शेळके, संपत चौधरी, धनंजय जाधव, राजेंद्र लहारे, सुनील कुरकुटे, बापू गोरे, रंगनाथ राशीनकर, संजय शेळके, राजेंद्र लहारे, अतुल लहारे, बाबासाहेब लासुरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...