आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद दिघे:चित्रपटाच्या माध्यमातून स्व. दिघेंचे कार्य जनतेसमोर आले : संभाजी कदम

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसैनिक कसा असावा, हे आनंदराव दिघे यांच्या कार्यातून दिसून येते. जनतेच्या कामांसाठी आपले आयुष्य पणाला लावून त्यांनी समाजशिल नेता कसा असतो हे दाखवून दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरु मानून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. चित्रपटच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्य लोकांसमोर आल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती येते, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

स्व. आनंदराव दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ या चित्रपटाचा शिवसैनिकांसाठी मोफत प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, सभापती पुष्पा बोरुडे, स्मिता अष्टेकर, माजी महापौर सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, दत्ता जाधव, अमोल येवले, शाम नळकांडे, अनिल बोरुडे, गिरिष जाधव, योगीराज गाडे, काका शेळके आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, स्व. दिघे यांनी जनसेवेच्या माध्यमातून आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्श आहे.

बातम्या आणखी आहेत...