आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटिसा:चढ्या भावाने बियाणे विक्री; दुकानाचा परवाना रद्द ; पाच दुकानदारांना त्रुटींसंदर्भात बजावल्या नोटिसा

माजलगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी दुकानदार शेतकऱ्यांना किमतीपेक्षा जास्त भावाने कपाशी बियाण्याच्या बॅग व सोयाबीन बियाण्याच्या बॅग चढ्या भावाने विकत असल्यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर कृषी विभाग जागा झाला. चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्या एका दुकानाचा परवाना निलंबित केला गेला तर पाच दुकानदारांना नोटीसा बजावल्या गेल्या असल्याची महाती जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक ए.डी. गरंडे यांनी दिली.

माजलगाव येथील सुमीत अॅग्रो एजन्सी या दुकानावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक यांनी डमी ग्राहक पाठवून चढ्या भावाने बियाणे विक्री होत असल्याची खात्री केली होती. या दुकानदाराला दोन दिवसांत म्हणणे मांडण्याचा वेळ दिला होता. परवाना अधिकारी तथा जिल्हा कृषी अधिकारी बीड यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली. खुलासा असमाधानकारक वाटल्याने सुमीत अॅग्रो एजन्सीचा परवाना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे. या दुकानांमध्ये बियाणे साठा फलक अद्ययावत ठेवला नाही. ग्राहकास देण्यात येणाऱ्या बिलावर सही केली जात नाही. या त्रुटी आढळल्यामुळे चौथ्या दिवशीही कृषी अधिकारी माजलगाव यांनी माजलगाव येथील पाच दुकानदारांना नोटिसा देऊन त्यांना एक संधी दिली आहे. यापुढे कोणी बियाणे चढ्या दराने विक्री केली तर त्यांची गय केली जाणार नसल्याचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक एस. डी. गरंडे, कृषी अधिकारी संगेकर, एस. जी. हजारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...