आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत -चेन्नई नॅशनल हायवेच्या भूसंपादनाबाबत प्रस्ताव पाठवा:सकारात्मक तोडगा काढू- गडकरींनी ग्वाही दिल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन बाबत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे प्रस्ताव माझ्याकडे पाठवा त्यावर सकारात्मक विचार करून तोडगा काढू, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी (17 जून) ला सायंकाळी अकोले येथे झालेल्या चर्चेत दिले. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

अकोले येथे शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यावेळी सुरत- चेन्नई -हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणी व भूसंपादनाचा विषय त्यांच्यासमोर मांडण्यात आला. राहुरी,नगर व राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांचा या राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीला विरोध असल्याचे गडकरी यांना अवगत करून देण्यात आले. त्यानंतर गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्यांबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पाठवावा,अशी सूचना त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत निश्चितपणे सकारात्मक विचार करून त्या अडचणी दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. हे डॉ. भोसले यांनी सांगितले.

मोजणीसाठी प्रशासनाला सहकार्य करा

अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत -चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादनापूर्वीची मोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध न करता मोजणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...