आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदिच्छा भेट:लगंर सेवेच्या सेवेदारांनी माणुसकी जिवंत ठेवली; मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह यांचे प्रतिपादन

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल अडीच वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरवित असलेल्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह यांनी भेट दिली. सिंह यांनी लगंर सेवेच्या सेवेदारांनी कोरोना काळात माणुसकी जिवंत ठेवली. त्यांच्या लंगरने अनेकांची भूक भागवली, संकटकाळात देवदूतप्रमाणे लंगर सेवेने दिलेले योगदान शहराच्या इतिहासात नमूद होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीपासून शहरातील लाखो गरजू घटकांना दोन वेळचे अन्न देऊन त्यांची भूक भागविण्यात आली. लंगर सेवेने तारकपूर येथे नुकतेच अन्न छत्रालय सुरु केले असून, अवघ्या १० रुपयात एका व्यक्तीला पोटभर जेवणाचे फूड पॅकेट दिले जात आहेत. मिस इंडिया उपविजेती झालेली उत्तर प्रदेशची मान्या सिंह मोरया युवा प्रतिष्ठान मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शहरात आली असता, तिने लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास भेट दिली.

सिंह यांनी यावेळी नागरिकांना फुड पॅकेटचे वाटप केले. याप्रसंगी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक अहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, सतिश गंभीर, राजा नारंग, जसबीरकौर नारंग, गोविंद खुराणा, प्रमोद पंतम, अपर्णा मदान, राजू जग्गी, टोनी कुकरेजा, मनोज मदान, अर्जुन मदान, दीलप्रीतकौर नारंग, क्षितीज भाटिया आदी उपस्थित होते. हरजितसिंह वधवा यांनी लंगर सेवेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. जसबीरकौर नारंग यांनी मान्या सिंह यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...