आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या टपाल कार्यालयाच्या बदलत्या कार्यप्रणालीमुळे जुन्या कर्मचाऱ्यांना काम करणे जिकरीचे होत असतानाही, पोस्टमास्तर ज्योती गटणे यांनी बदलत्या परिस्थितीशी सांगड घालत, नवनवीन बदल स्वीकारत आपली सेवा पूर्णत्वास आणली. सुखद सेवानिवृत्ती होण्यासाठी प्रत्येकास आपल्या सेवा काळात काळजीपूर्वक काम करावे लागते.
सेवापूर्ती हा आयुष्यातील अनमोल योग असतो, असे प्रतिपादन पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव यांनी केले. आनंदीबाजार टपाल कार्यालयाच्या पोस्टमास्तर ज्योती गटणे या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या. त्यांचा सेवापूर्ती सोहळा आनंदीबाजार टपाल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रवर अधीक्षक वाय. पी. साळवे हे होते.
याप्रसंगी अधीक्षक हनी गंजी,संदीप हदगल, के. एम. कुमठेकर, रामभाऊ लांडगे, संदीप कोकाटे, संतोष जोशी, अॅड. प्रकाश गटणे, कमलेश मिरगणे, बापू तांबे, सागर पंचारिया,अमोल साबळे,नामदेव डेंगळे, सचिन थोरवे,तान्हाजी सूर्यवंशी,प्रदीप सूर्यवंशी,उदय गंधे,महेश राछ, निलिमा कुलकर्णी,वंदना नगरकर, प्रज्ञा बापट, छाया शिंदे, उल्का दळवी, सतीश बंड, संतोष जाधव आदी उपस्थित होते. गटणे यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अन्सार शेख यांनी, सूत्रसंचालन कमलेश मिरगणे यांनी, तर आभार सचिन थोरवे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.