आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक हा देशाचा कणा:देश सेवा हीच ईश्वर सेवा : रुईकर

शेवगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिक हा देशाचा कणा आहे. सैनिकामुळेच आपण आज सुरक्षित आनंद घेत आहोत. आपल्या देशासाठी सैनिक हा घरादाराचा त्याग करून सीमेवर डोळ्यात तेल घालून उभा राहतो. वेळप्रसंगी आपल्या देशासाठी स्वतःचे बलिदान देतो. देशाची सेवा करण्यात तो धन्य मानतो. देश सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. यापुढे सालवडगाव येथे २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल, असे प्रतिपादन सरपंच अण्णासाहेब रुईकर यांनी केले.

या गावचे भूमिपुत्र मेजर रुस्तम रुईकर यांनी देशसेवेमध्ये सुभेदार पदावर कार्यरत असताना २८ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रम प्रसंगी रुईकरत बोलत होते. यावेळी मेजर रुईकर यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिनाथ लांडे, नवनाथ भापकर, दादासाहेब भापकर, काशिनाथ रुईकर, विनोद मगर, बप्पासाहेब लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार रामनाथ रुईकर, रमेश रुईकर ,नारायणराव टेकाळे, उपसरपंच भारत लांडे, अनिल लांडे, दीपक रुईकर, माजी सैनिक तुळशीराम पठाडे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा रुईकर यांनी केले तर आभार देवेंद्र लांडे यांनी मांडले यावेळी गावातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...