आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:सर्जेपुरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगले सेवाप्रितचे गरबा नृत्य; गरबा सांस्कृतीक कार्यक्रमाने नवरात्र उत्सवाची उत्साहात सांगता

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवाची सांगता सेवाप्रित सोशल सोशल फाऊंडेशनच्या रास गरबा कार्यक्रमाने झाली. पारंपारिक वेशभुषेत आलेल्या महिलांनी नृत्याचे सादरीकरण करुन या कार्यक्रमाचा आनंद लुटला.मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी सेवाप्रितच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, डॉ. सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नायर, स्विटी पंजाबी, निशा धुप्पड, अनू थापर, रितू वधवा, गीता माळवदे आदींसह महिला सदस्या व शीख, पंजाबी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवरात्रीनिमित्त बंगाली वेशभुषा करुन आलेल्या सेवाप्रितच्या महिला सदस्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.प्रिया नागपाल यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी गरबा नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

गरबा कार्यक्रमासाठी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. नवरात्री व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साकारलेल्या सेल्फी पोईंटवर महिलांची मोठी गर्दी झाली होती.या सोहळ्यासाठी राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टने संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सेवाप्रितच्या वतीने ट्रस्टच्या सर्व विश्‍वस्तांचा प्रातिनिधिक स्वरुपात ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांचा सत्कार करुन आभार मानण्यात आले. सेवाप्रित संस्थेच्या वतीने वेळाेवेळी सामाजिक उपक्रम राबवले जातात.

बातम्या आणखी आहेत...