आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे नुकसान:नाथसागर चे सात आपत्कालीन दरवाजे प्रथमच उघडले

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग तीन वर्षापासून जायकवाडी धरण भरत आहे. शनिवारअखेर जायकवाडी धरण ९८ टक्के भरले. पाण्याची आवक वाढल्यामुळे यावर्षी प्रथमच सात आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, खामगाव, भावीनिमगाव,ढोरसडे, हिंगणगाव अंत्रे, शहरटाकळी, कऱ्हेेटाकळी, दादेगाव, एरंडगाव, लाखेफळ, दहिफळ, ताजनापूर, बोडखे, या गावात जायकवाडी धरणाचा पाण्याचा फुगवटा वाढला आहे. त्यामुळे काही असंपादित क्षेत्रात पाणी आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी धरणात येणाऱ्या पाण्याचे आवक ७५,००० क्युसेस इतका होता. त्यामुळे धरणातून गोदावरी पात्रात २७ पैकी २५ दरवाजांमधून ७९,१२४ क्युसेस विसर्ग करण्यात होता. शनिवारी ६० हजार क्युसेस येणाऱ्या पाण्याची आवक असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात १८ दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत आहे. सलग तीन वर्षापासून हे धरण भरत आहे. याचा सामना शेवगाव तालुक्यातील गाळपेर जमिनींधारंकाना करावा लागत आहे. नाशिकसह वरील भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जायकवाडी नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक येत असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामसेवकांनी मुख्यालयी रहावे
नदीकाठी असलेल्या आपेगाव, वडवळी, नवगाव, उचेगाव, टाकळी अंबड,पाटेगाव, नायगाव या गावातील नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. संभाव्य पूर परिस्थितीत सेवा देण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी आपल्या मुख्यालयीच राहण्याच्या सूचना देण्यात देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पैठणचे शाखा अिभयंता विजय काकडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...