आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी:पारनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई; टँकर सुरू करण्याची नगरपंचायतीकडून मागणी, उपनगराध्यक्ष भालेकरांसह मुख्याधिकारी यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

पारनेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपंचायतीच्या हद्दीतील, शहरालगतच्या वाड्या वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या परिसरासात पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. तसे निवेदन उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते, मुख्याधिकारी सुनीता कुमावत यांनी तहसीलदारांना पाठवले.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतच्या एकूण १७ प्रभागांपैकी वाड्या वस्त्यांचा समावेश असलेल्या १० प्रभागांमध्ये नगरपंचायतीमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नाही. तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खासगी विंधन विहिरी, विहिरी, बंधारे तसेच तलावांवरच अवलंबून आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे हे सर्व उद्भव कोरडे पडले आहेत. त्यामुळे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सांडपाणी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला.

त्यामुळे शहरालगतच्या वाड्या वस्त्यांवर तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते, नगरसेवक अशोक चेडे, बाळासाहेब औटी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...