आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:शिर्डीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 6 हॉटेलवर छापा; 15 तरुणींची सुटका

प्रतिनिधी | शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ६ हॉटेलवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तरुणींची सुटका केली. हॉटेल चालकांसह ग्राहक म्हणून आलेल्या ११ पुरुषांना ताब्यात घेतले.

शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेवगाव, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, राहाता व शिर्डीसह विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेगवेगळी ६ पथके नेमली. यानंतर हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून व्यवसाय सुरू असल्याची खातरजमा केली. नंतर हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एसपी, हॉटेल साई शीतल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा या हॉटेल्सवर छापा टाकून धरपकड केली. तसेच हॉटेल चालकांसह ग्राहक म्हणून आलेल्या ११ व्यक्तींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. शनिवारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.