आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर माजी मंत्री, सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने जनसेवा करीत जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला. स्व. कोल्हे हे महाराष्ट्राला समृद्ध करणारे द्रष्टे लोकनेते व उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. स्व. कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, कृषी, सिंचन, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी स्व. कोल्हे यांच्या कार्याचा गौरव केला. माजी मंत्री व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा रविवारी येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केला होता.
याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, शिवाजी कर्डिले, आनंद महाराज, परमानंद महाराज, रमेशगिरी महाराज यांनी माजी मंत्री स्व. कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यास स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहचारिणी सिंधुताई कोल्हे, भगिनी सुमन पवार, कुसुम शिंदे, नीलिमा पवार, स्नेहलता कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, सुरेश कोल्हे,अनिल कोल्हे,दिलीप कोल्हे,रजनीश कोल्हे, वसंत कोल्हे, राजेंद्र कोल्हे, सचिन कोल्हे, अमृता पवार, प्राची पवार, मनाली कोल्हे, निकिता कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, नितीन कोल्हे,बिपीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, स्नेहलता कोल्हे,प्रणव पवार, विवेक कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे,इशांत कोल्हे,वेदांत कोल्हे व कोल्हे परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोरगरिबांच्या सेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका, फिरता दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. काँग्रेस नेते थोरात म्हणाले, सतत नव्या नव्या तंत्रज्ञान संशोधनाचा ध्यास घेत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी काळया आईबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल हाच ध्यास जपला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.