आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांचा निशाणा:'एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलेय', शरद पवारांचा मधुकर पिचड यांना टोला

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

पक्षाला गळती लागलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या मधुकर पिचड यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. आज शरद पवार हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पिचड यांच्यावर निशाणा साधला आहे. एक दीड वर्षांपासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे असे म्हणत त्यांनी पिचड यांना चिमटा काढला.

माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार यांनी भाष्य केले आहे. पवार पुढे म्हणाले की, 'राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यामध्ये सभा घेतली, यावेळीच जनतेच्या मनातील कळाले होते. जनतेला परिवर्तन हवे होते आणि ते झाले आहे' असे म्हणत पवारांनी मधुकर पिचड यांना सुनावले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 'यशवंत भांगरे माझ्या अगोदर 5 वर्षांपूर्वी विधानसभेमध्ये होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारमध्ये भांगरे याचा मोठा वाटा होता. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आहे. अशीच साथ त्यांनी पुढेही द्यावी' असे आवाहनही पवार यांनी केले आहे. तसेच या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागले आहे, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला.