आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीच्या रडारवर पवार कुटुंबीय?:रोहित पवार म्हणाले - कारवाई कोणत्या हेतूने माहित नाही, पण चौकशीला सहकार्य करेल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरूवात झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

कारवाई कोणत्या हेतूने?

रोहित पवार म्हणाले, माझ्याविरोधात कुठल्या हेतून कारवाई केली जात आहे? सरकार मुद्दाम कारवाई करत आहे का?, हे मला माहिती नाही. मात्र, एक सामाजिक कार्यकर्ता, युवा म्हणून चौकशीला सामोरे जाईल व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेल. तसेच, सरकार नेमक्या कुठल्या बुद्धीने ही कारवाई करत असेल, हे सांगता येत नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

यापूर्वीही चौकशी

रोहित पवार म्हणाले, मी संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचीच्या काही व्यवहारांची चौकशी होणार असल्याचे मीही ऐकत आहे. मात्र, नेमकी कशाची चौकशी आहे, काय कागदपत्रे कंपनीकडे आले आहेत, याबाबत माहिती नाही. हे तपासूनच याबाबत सविस्तर माहिती देईल. तसेच, यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे. त्यावेळीही तपास यंत्रणांना सहकार्य केल आहे. आताही करेल.

मला एकच भीती

एकनाथ शिंदे यांच्या बंडावरूनही रोहित पवार यांनी टीका केली. रोहित पवार म्हणाले, माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एकच भीती आहे. एवढा प्रचंड निधी आमदार फोडण्यासाठी वापरला जात असेल तर सर्वसामान्य, वारकरी, शेतकरी यांचे प्रतिनिधित्वच अडचणीत येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात एवढा पैसा वापरला जात असेल तर यापुढे सर्वसामान्यातून प्रतिनिधीत्वच पुढे येणार नाही. सर्वसामान्यांतून प्रतिनिधित्व पुढे यावे, यासाठी आता प्रयत्न करावे लागतील.

नेमके काय आहे प्रकरण?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार झाल्याची लेखी तक्रार ईडीला प्राप्त झाली आहे. यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या कंपनीमध्ये रोहित पवार हे 2006 ते 2012 पर्यंत संचालक होते. या कंपनीशी येस बँक, डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील संबंध असल्याचे समजते. मात्र, वाधवान बंधूंचे नाव येस बँक-डिएचएफएल घोटाळ्यात पुढे आल्यानंतर रोहित पवार यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...