आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीच सरस:राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत शौर्य आठरे राज्यात तिसरा; तर समर्थ ढेरे हा राज्य गुणवत्ता यादीत सातवा

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत (नॅशनल स्कॉलरशिप सर्च एक्झाम एनएसएसई) नेवासे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

नेवासे तालुक्यातील गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि उपक्रमशील असलेली जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा नेवासे खुर्द मुले शाळेमधील इयत्ता तिसरी मधील शौर्य आठरे राज्यात तृतीय, इयत्ता दुसरी मधील समर्थ ढेरे याने राज्य गुणवत्ता यादीत सातवा, प्रणम्य मापारी राज्यात तेरावा व श्लोक बारगजे चौदावा आणि इयत्ता तिसरी मधील शौर्य आठरे राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी व्हावी या उद्देशाने राज्यभरातून विविध इयत्तेचे पंधरा हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रतिभा गाडेकर, आण्णासाहेब शिंदे, मिनाक्षी लोळगे व पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनीही विशेष प्राविण्य संपादन केले आहे.

याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे,अरविंद घोडके, राहुल आठरे, साईनाथ वडते, छाया वाघमोडे, प्रतिभा पालकर,प्रतिमा राठोड, ज्योती गाडेकर, विद्या खामकर, अश्विनी मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, पद्मा येणारे, केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप,नगराध्यक्ष योगिता पिंपळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्मिता आंबिलवादे आदींनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,पालक तसेच शाळेचे अभिनंदन केले आहे .

बातम्या आणखी आहेत...