आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑगस्ट २०२२ या महिन्यातील शेतकरी आयडॉल म्हणून सचिन शेलार सातारा (म्हसवे ) व पुणे येथील हेमंत कळमकर यांचा समावेश आहे. राहुरी कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजकाचा परिचय शेतकरी व विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदवीचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात लावण्यात येतो.
जेणेकरुन कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणाऱ्या शेतकरी,अधिकारी व विद्यार्थ्यांना या कार्याची माहिती होऊन शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. शेलार हे जरबेरा, निशिगंध, डच गुलाब, ग्लॅडीएटर, सुगंधी पाकळीसाठीचा गुलाब या फुलांची हायटेक शेती करीत आहेत. पुणे येथील कळमकर यांनी अॅगझॉन ग्रुपच्या माध्यमातून ४०० पेक्षा जास्त व्यवसाय भागिदारांच्या मजबुत नेटवर्कमुळे दर्जेदार प्रॉडक्टस् जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.