आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:समाज माध्यमावरील त्या आक्षेपार्ह‎ व्हिडिओ प्रकरणी आज शेवगाव बंद‎

शेवगाव शहर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत‎ आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करून‎ हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा‎ प्रयत्न केल्याने शेवगाव शहरात‎ तणाव निर्माण झाला होता. हा‎ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन‎ समाजकंटकावर गुन्हे दाखल‎ करण्यात आले असून या घटनेच्या‎ निषेधार्थ सोमवारी सर्व संघटनाच्या‎ वतीने शेवगाव शहर बंदची हाक‎ देण्यात आली.‎ शेवगाव शहरातील दोन समाज‎ कंटकानी जातीय तेढ निर्माण‎ करण्याच्या दृष्टिने शनिवारी दुपारी‎ छत्रपती शिवाजी महाराजांबाबत‎ आक्षेपार्ह व्हिडीओ मोबाइलवर‎ व्हायरल केल्याने शिवप्रेमींच्या‎ भावना दुखावल्या.

ही माहिती‎ वाऱ्यासारखी शहरात पसरताच तीव्र‎ संताप व्यक्त होत राहिला. रात्री सर्व‎ हिंदू धर्माचे रक्षक शेवगाव पोलिस‎ ठाण्यात जमा झाल्याने तणावाचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वातावरण निर्माण झाले होते.‎ कारवाईच्या मागणीसाठी काही‎ युवक रस्त्यावर उतरले. याची‎ माहिती मिळताच शेवगाव, पाथर्डी,‎ नेवासे, सोनई येथील पोलिस‎ पथकासाह उपविभागीय पोलिस‎ अधिकारी संदीप मिटके शेवगावात‎ दाखल झाले. उपस्थितांच्या भावना‎ लक्षात घेऊन रात्री १ वाजता हा‎ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन‎ समाजकंटकावर गुन्हा दाखल‎ करण्यात आल्यानंतर पोलिसांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्यांना ताब्यात घेतले. रविवार या‎ घटनेची माहिती मिळताच शहरात‎ सोशल मीडियातून संतप्त भावना‎ उमटल्या. या घटनेच्या निषेधार्थ‎ सोमवार शहर बंदची हाक देण्यात‎ आली असून आक्षेपार्ह मजकूर‎ पसरवण्यामागे मुख्य सूत्रधार कोण‎ आहे, याचा शोध घेऊन त्यास‎ त्वरित अटक करावी, अशी मागणी‎ विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी‎ रविवारी पोलिस निरीक्षक यांना‎ दिलेल्या निवेदनाद्वारे केली.‎

बातम्या आणखी आहेत...