आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची खेळी:पवारांची ‘पॉवर’ कमी करण्यासाठी राम शिंदे ‘चार्ज’, पंकजा मुंडेंनंतर आता लक्ष्य रोहित पवार

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना डावलत राज्याच्या राजकारणात अचानक चमकणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना भाजपने आता पुन्हा एकदा विधान परिषदेतून सक्रिय राजकारणात उतरविले आहे.

जलसंधारण मंत्रालयांतर्गत जलयुक्त शिवार ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना राबविली जात असतांनाच परदेश दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडे यांना कानोकान खबर न होता या मंत्रालयाचा कारभार देवेंद्र फडणवीसांनी तेंव्हा राम शिंदे यांच्याकडे सोपविला होता. त्यांची अशी लॉटरी लागण्याची ती पहिलीच वेळ. त्याआधी राम शिंदे यांची ओळख पंकजा मुंडे यांचे समर्थक अशीच होती. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनीच पंकजा मुंडे यांनी “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे” असं वक्तव्य करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. हा थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान देण्याचा प्रकार मानला गेला. नगर जिल्ह्यातील बहुचर्चित चिक्की घोटाळा उघडकीस आल्यानंतर मात्र त्यांना बॅकफूटवर जावं लागलं. आता अडीच वर्षांनंतरही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल अशी शक्यता असतानाच राम शिंदे यांचे नाव जाहीर झाल्याने पुन्हा एकदा लॉटरी लागल्याचा फील त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही येतो आहे.

भाजपचा पॉवर गेम!
कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मागच्याच निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव केला होता. या दोन्ही तालुक्यातून गेल्या अडीच वर्षात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला आहे. शरद पवार यांनी मध्यंतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने चोंडीत येऊन आ. रोहित पवार यांना त्याची पोहोच पावती आशीर्वादासह दिली होती.

जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसत असतानाच होळकर घराण्याचे वंशज मानले जाणारे राम शिंदे आमदार म्हणून पुन्हा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिसऱ्या पिढीतील ‘पॉवरफूल’ बनत चाललेल्या नेतृत्वाला मतदार संघातूनच शह देण्यासाठी भाजपने डिस्चार्ज झालेल्या राम शिंदे यांना ‘चार्ज’ केल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...