आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:अत्याचार प्रकरणातील आरोपी शिंदे गजाआड

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली. गणेश सोन्याबापू शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. नगर शहरातील उपनगरात राहणाऱ्या तरुणीने गणेश शिंदे विरोधात २१ मार्च रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गणेशने फिर्यादी तरूणीला त्याच्या घरी बोलवून लग्नाची मागणी घातली. त्या मागणीला तरूणीने होकार दिला. तेव्हा गणेशने तरूणीच्या इच्छेविरूध्द संबंध केले व त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गणेशने तरुणीकडे पैशाची मागणी केली होती. गुन्हा दाखल होताच गणेशने नगरमधून पळ काढला. तो गोवा, नाशिक, संगमनेर आदी ठिकाणी वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. तो नगरमध्ये आल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रणदिवे, अंमलदार सुनील शिरसाठ, अविनाश वाकचौरे, भास्कर गायकवाड, सचिन बाचकर, धीरज खंडागळे, नीलेश ससे, सतीश भवर यांच्या पथकाने शिंदेला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...