आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांकडुन संताप:शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शिंदे गटाचा आंदोलनाचा इशारा ; आयुक्तांना दिले निवेदन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती द्यावी. तात्पुरती मलमपट्टी न करता नव्याने रस्ते करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. नागरिकांना खड्ड्यां मळे मणक्याचे आजार होत आहेत. सर्वत्र धुळीमुळे श्वसनाचे आजारही होत आहेत. नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अपघात होऊन काहींना अपंगत्व आले, तर काहींनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे शहरात रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पूर्णपणे नव्याने रस्ते करण्यात यावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मंजूर असलेल्या रस्त्यांच्या कामांना कमी पडणाऱ्या निधीची तातडीने व्यवस्था करावी. रस्ता दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करून शहरातील उपनगरे, सावेडी, केडगाव येथील रस्ते दुरुस्त करावेत. मनपाने १५ दिवसांत कामे हाती घ्यावीत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...