आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी:पिल्लासाठी कावळे आक्रमक हाेतात तेव्हा! कावळ्यांच्या दहशतीमुळे परिवाराला घराबाहेर पडणे मुश्कील

शिर्डी / नवनाथ दिघे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिल्लाच्या जवळ जाणाऱ्यांवर कावळे असे हल्ले करतात. छाया : किरण वाबळे - Divya Marathi
पिल्लाच्या जवळ जाणाऱ्यांवर कावळे असे हल्ले करतात. छाया : किरण वाबळे

कावळा हौसेने पाळीला । परि हा जातीवरी गेला ।। खाऊनिया दूध-भात । चोच उडवी थरकाप ।। अशी जगाची हो रीत । जशी कावळ्याची जात ।। संत तुकाराम महाराजांचा उपराेक्त अभंग सांगताे की, एरवी माणसांच्या सहवासात राहणारा कावळा संकट आले किंवा पिल्लांपाशी कुणी जाण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी माणसाचाही थरकाप उडवताे. सध्या त्याचीच तंताेतंत अनुभूती शिर्डी येथील शेळके कुटुंबीयांना घ्यावी लागत आहे. कारण कावळ्यांच्या दहशतीमुळे परिवाराला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

सामान्यत: काेणाचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु आखाें देखी घडल्यानंतर मात्र ताे ठेवावाच लागताे. हाॅटेल व्यावसायिक असणारे प्रकाश शेळके हे त्यांच्या शिर्डी-पिंपळवाडी रोडवरील फार्महाऊसमध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शेजारी लिंबाच्या झाडावर कावळ्याचे घरटे आहे. त्यातील एक पिल्लू घरासमोरील अंगणात खाली पडले. त्यास अजून उडता येत नाही. मात्र त्याच्या रक्षणासाठी २४ तास पहारा देणाऱ्या कावळ्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या शेळके परिवाराला जेरीस आणले आहे. इतके की त्यांना घराबाहेर पडणेदेखील मुश्कील झाले आहे. आपला राेजचा माॅर्निंग वाॅकचा शिरस्ताही त्यामुळे खंडित झाल्याचे शेळके यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. कावळ्याच्या पिल्लास पाणी, भात वगैरे ठेवण्याचे उपाय याेजण्याचा प्रयत्न करूनही ते जुमानत नाहीत. त्यांची कर्णकर्कश काव ...काव असह्य हाेते ती वेगळीच!

बातम्या आणखी आहेत...