आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिर्डी अत्याचार: आणखी दोघे ताब्यात

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका संस्थेतून निघून गेलेल्या तरुणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या प्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.उमेश भागचंद राठोड (वय १९), जितेंद्र रमेश चव्हाण (वय २१), लखन अरूण गोसावी (वय २३) व एक अल्पवयीन (सर्व रा. कुंभारी खुर्द ता. जामनेर, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.

शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी एका तरूणीवर अत्याचार केला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी शिर्डी येथील घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सुरूवातीला दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आली. तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

ही कारवाई अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील, शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आठरे, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, महिला सहाय्यक निरीक्षक पल्लवी उबरहंडे, उपनिरीक्षक दीपक पाठक, उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक माळी, अंमलदार विजय नवले, मच्छिंद्र पांढरकर, संदीप चव्हाण, किशोर जाधव, जयसिंग शिंदे, संदीप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राणी वरघुडे, मैना माळी, सुलभा औटी यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...