आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईदर्शन:ऑफलाइ नदर्शन पासेसनाही आता मिळाली परवानगी, रोज 10 हजार भाविकांना ऑफलाइन पास मिळू शकतील

शिर्डी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईभक्तांसाठी बुधवारपासून (दि.१७) ऑफलाइन दर्शन पास सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी साईबाबा संस्थानला परवानगी दिली. मात्र अद्याप लाडू प्रसाद व प्रसादालय सुरू करण्यास मंजुरी मिळालेली नाही. रोज १० हजार भाविकांना ऑफलाइन पास मिळू शकतील. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१५ हजार भाविकांना ऑनलाइन पासेस काढता येतील. अधिकाधिक भाविकांनी ऑनलाइन पासेस काढूनच दर्शनास यावे, असे आवाहन संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी केले. रविवारी अनेक भाविकांचे ऑनलाइन दर्शनासाठी पैसे कट झाले परंतु, पास न निघाल्याने भाविकांनी मंदिर महाद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले होते. ऑफलाइन पाससाठी भाविकांसह नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी पक्षांनी मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...