आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरतीच्या वेळेत बदल:साईबाबांच्या आरतीच्या वेळा पूर्ववत; काकड आरती पहाटे सव्वापाच, तर शेजारती रात्री 10 वाजता

शिर्डी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साईबाबा संस्थानने पूर्वीप्रमाणे काकड आरतीची वेळ पहाटे सव्वापाच, तर शेजारतीची वेळ रात्री १० वाजता करण्‍याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या ( १ मार्च) औचित्यावर आरतीच्या या वेळेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग‍यश्री बानायत यांनी दिली.

सीईओ बानायत म्हणाल्या, श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात प्रथेप्रमाणे विविध पूजा नियमित केल्या जातात. यात काकड आरती, मध्यान्ह‍ आरती, धुपारती व शेजारतींचा समावेश आहे. या सर्व आरतींना साईभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या आरत्यांचे अनन्य‍साधारण महत्व आहे. २००८ मधील गुढीपाडव्यापासून साई समाधी मं‍दिरातील काकड आरतीच्या वेळेत बदल करून पहाटे साडेचार तर शेजारती रात्री साडेदहा वाजता करण्याचा निर्णय तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने घेतला होता.

त्यानुसार हा बदल करण्यात येऊन दैनंदिन कार्यक्रमाच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. परंतु, साईभक्तांकडून काकड आरती व शेजारतीच्या वेळेत पूर्वीप्रमाणे बदल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार संस्थानच्या व्यवस्थापन मं‍डळाचे अध्यक्ष आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त मंडळाने २४ जानेवारीच्या सभेत काकड आरती व शेजारतीच्या वेळेत बदल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. काकड आरती व शेजारतीच्या वेळेत बदल होत असल्यामुळे श्री साईबाबा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेतही काहीसा बदल करण्यात येत आहे. यात पहाटे ४.४५ वाजता समाधी मंदिर उघडून पहाटे ५ वाजता भूपाळी रेकॉर्ड सुरू होईल. पहाटे सव्वापाच वाजता काकड आरती, सकाळी साडेपाचला श्रींचे मंगलस्नान, त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल.

बातम्या आणखी आहेत...