आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईचरणी भरभरुन दान:गत 7 महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन; 188 कोटींचे दानही केले

शिर्डी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिर्डीतील साईबाबांचे द्वार खुले करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात 64 लाख भाविकांना साईंचे दर्शन घेतले असून, साई बाबांच्या तिजोरीत 188 कोटींपेक्षा जास्त दान जमा झाला आहे. साईचरणी दरवर्षी अनेक भाविक येतात मात्र, दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने भाविकांना दर्शनासाठी येता आले नाही. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर साई बाबांच्या चरणी भाविक भरभरुन दान देत आहेत.

साई मंदिर संस्थानने दिलेल्या माहितीनूसार, ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या कालावधीत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. तर याच कालावधीत सुमारे 64 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. कोरोना काळात शिर्डीचे अर्थचक्र बिघडले होते. मात्र, आता देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिर्डी संस्थानचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...