आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:शिर्डी संस्थानच्या निधीतील खोल्या रखडल्या

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी संस्थांनकडून पाच वर्षांपूर्वी शाळा खोल्या बांधकामासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु, या खोल्या राज्य सरकारच्या बांधकाम विभागामार्फत बांधण्याची अट घालण्यात आली होती. त्यावर जिल्हा परिषदेने बांधकामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यास परवानगी मागितली आहे. परंतु, अद्याप अटीशर्तीत बदल नसल्याने शाळा खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर आता पेच निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात साडेतीन हजारांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यापैकी सुमारे ८०० वर्ग खोल्या बांधण्याची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजनमधून ४२० वर्ग खोल्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असली, तरी अद्याप कामे सुरू होऊ शकली नाहीत. २६ जून २०१८ मध्ये नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी शिर्डी संस्थांकडूनकडून पहिल्या टप्प्यात सुमारे १० कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता. तथापि, शासनाच्या आदेशातील अट क्रमांक दोननुसार वर्गखोल्यांचे बांधकाम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान २०१९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

पुढे १६ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेने ही बांधकामे जिल्हा परिषदेमार्फत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी जिल्हा परिषदेमार्फत करण्यासाठी शासन निर्णयात दुरूस्तीचे पत्र विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना नुकतेच ९ ऑगस्ट २०२२ रोजी संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवले आहे. शाळा खोल्यांच्या बांधकामाबाबत पुन्हा एकदा खल सुरू झाला असून निर्णयातील दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत एका शाळा खोलीसाठी सुमारे ९ लाख ५० हजार खर्च येतो. परंतु, प्रशासकीय गोंधळात आजही सुमारे ८० ठिकाणी उघड्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी वर्ग भरतात.

जिल्हा परिषदेकडे बांधकामासाठी यादी तयार
शाळा खोल्यांच्या बांधकामाबाबत जिल्हा परिषदेची यादी तयार आहे, परंतु, बांधकामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्याची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. शासन निर्णयातील अट दुरूस्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला, तर बांधकामे सुरू होतील.

बातम्या आणखी आहेत...