आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारंपरिक वाद्याचा गजर, जय भवानी जय शिवराय या घोषणाबरोबरच युद्धातील चित्तथरारक प्रात्यक्षिकाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त राहुरी शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शनिमंदिराच्या प्रांगणात रावसाहेब खेवरे यांच्या हस्ते रायगड येथून पायी आणलेल्या ज्योतीचे पूजन करून शिवजयंतीस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण तनपुरे, शिवसेना सह संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे, सचिन म्हसे, गणेश खेवरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. शनिमंदीर प्रांगणात संगमनेर येथील श्रीगणेश पथकाच्या दांडपट्टा, लाठीकाठीसह चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिवसेनेच्या वतीने सर्वत्र भगवे झेंडे लावून राहुरी शहरातील वातावरण भगवेमय करण्यात आले होते. जयंती कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सचिन म्हसे, संतोष येवले, अशोक खेवरे, राहुल चोथे, सतीश माने, रमेश कोकाटे, अमोल पवार, सुनील शेलार, गणेश खेवरे, विजय शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. यावेळी विलास ढोकणे, हमीद पटेल, विठ्ठल सूर्यवंशी, प्रमोद भट्टड, कैलास शेळके, ईश्वर ढोकणे, प्रमोद शेटे, विक्रम पेरणे, संदीप म्हसे, नयन खेवरे, महेश बोर्डेसह शिवप्रेमी उपस्थित होते. दुपारी चार वाजता हिंदू ग्रूपने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीचे उद्घाटन राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघश्याम डांगे व प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राहुल शेटे यांच्या हस्ते झाले. हिंदू ग्रूपने आकर्षक अशा फुलांच्या सजावटीने सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.